पुणेकरांनो, स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय

File Photo

वातावरण बदलाने शहरात दिवसाआड सापडतोय रुग्ण

पुणे – संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शहरात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या दिवसाआड एक रुग्ण सापडत असल्याचे समोर आले आहे.

कडक उन्हाळ्यामुळे मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लू गायब झाला होता. मात्र, जूनच्या अखेरीस ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली. हवेत गारवा असल्यामुळे आणि ढगाळ वातवरणामुळे आठ दिवसांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दर दोन दिवसाला एका व्यक्तीला स्वाइन फ्लूची लागण होत असून, दररोज 30 ते 40 संशयीत रुग्ण आढळून येत आहे.

सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 3 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर एकावर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 1 जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत 3 लाख 28 हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 123 रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले. मात्र, मागील आठ दिवसांत 5 रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 276 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

मुंबई दुसऱ्या क्रमांकावर
देशातील सर्वाधिक कचरा निर्मिती असलेल्या पहिल्या दहा शहरांत पुण्याचा आठवा क्रमांक आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबईत दिवसाला 7 हजार 500 टन (70 लाख 50 हजार किलो) कचऱ्याची निर्मिती होते, तर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई असून तेथे दररोज 5 हजार टन (50 लाख किलो) कचरा निर्मिती होते. चौथ्या क्रमांकावर हैद्राबाद आहे. त्या ठिकाणी 4 हजार टन (40 लाख किलो) कचऱ्याची निर्मिती होते. तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अहमदाबाद आणि कोलकाता असून तेथेही हैदराबादएवढाच कचरा तयार होतो. तर सातव्या क्रमांकावर बंगळुरू असून त्या ठिकाणी दिवसाला 30 लाख किलो (3 हजार टन) कचऱ्याची र्निमिती होते.

डॉक्‍टर म्हणतात…
नागरिकांनी सतर्क रहावे. घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल किंवा मास्क बांधूनच घराबाहेर पडावे. तर सर्दी, घसा, खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शक्‍यता सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)