India vs South Africa Test Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपन्न झाली आहे. आता कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 डिसेंबरला सुरु होणार असून यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. भारताने वनडे मालिका 2-1 ने जिंकली आहे. यानंतर आता टेस्ट मालिका सुरु होणार आहे. या सामन्याच्या काही दिवस आधी एका दिग्गज खेळाडूने या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो भारताविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. एल्गरची आतापर्यंतची चमकदार कारकीर्द आहे. सुमारे 12 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 84 सामने खेळले. या कालावधीत 13 शतके आणि 23 अर्धशतके झाली. एल्गर हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेचा भाग आहे. तो शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळणार आहे. हा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. क्रिकइन्फोवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार एल्गरने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. तो केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे.
निवृत्तीबाबत एल्गर म्हणाला, ‘‘क्रिकेट खेळणे हे एक स्वप्न राहिले आहे. पण आपल्या देशासाठी खेळणे ही मोठी गोष्ट आहे. 12 वर्षे आपल्या देशासाठी खेळणे हे एका मोठ्या स्वप्नासारखे आहे. केपटाऊनमध्ये कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हे माझे आवडते स्टेडियम आहे.”
IND vs SA 3rd ODI : तिसऱ्या सामन्यासह भारताचा 2-1 ने ऐतिहासिक मालिका विजय…
डीन एल्गर हा 36 वर्षांचा आहे. एल्गरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 84 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 13 शतके आणि 23 अर्धशतके केली आहेत. एल्गरची कसोटी सर्वोत्तम धावसंख्या 199 धावा आहे. त्याने 5 हजार 146 धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजीतही हात आजमावला आहे. एल्गरने 45 कसोटी डावात 15 विकेट घेतल्या आहेत. या काळात एका डावात 22 धावांत 4 बळी घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. एल्गरने 8 वनडे सामनेही खेळले आहेत. पण यात काही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना 26 डिसेंबरपासून होणार आहे. हा सामना सेंच्युरियनमध्ये होणार आहे. दुसरा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाईल. एल्गरच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असेल.