नवी दिल्ली – भारताच्या सरगम कौशलने 2022 सालचा “पिजंट इंडिया मिसेस वर्ल्ड’ किताब जिंकला आहे. या किताबासाठी 63 देशांमधील सौंदर्यवतींमधून सरगम कौशलची निवड करण्यात आली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हा किताब भारताच्या सौंदर्यवतीने पटकावला आहे.
नाताळच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये संप; पंतप्रधान ऋषी सुनक यांनी घेतला मोठा निर्णय
लास वेगास येथील वेस्टगेटमध्ये झालेल्या समारंभात अमेरिकेच्या 2021 मिसेस वर्ल्ड किताबाची मानकरी शेलिन फोर्डने सरगम कौशलच्या डोक्यावर मिसेस वर्ल्डचा मुगुट ठेवला. मिसेस पॉलिनेसिया ही या स्पर्धेतील उपविजेती ठरली. तर मिसेस कॅनडा ही तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धक ठरली.
सरगम कौशलने इन्स्टाग्रामवरून आपल्या विजेतेपदाची माहिती दिली आहे. तब्बल 21 वर्षांनतर हा किताब भारताला मिळाला असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सरगम कौशल मूळची जम्मू-काश्मीरची रहिवासी असून सध्या ती मुंबईमध्ये वास्तव्याला आहे.
दरम्यान, 2001मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आदिती गोवित्रीकरला मिसेस वर्ल्ड किताब मिळाला होता. सरगम कौशलचे आदिती गोवित्रीकरनेही अभिनंदन केले आहे. विवाहित महिलांसाठी मिसेस वर्ल्ड ही सौंदर्यस्पर्धा 1984 पासून सुरू झाली आहे.