नवी दिल्ली: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरला जाणार आहे. NCERT अर्थात National Council of Educational Research and Training हा म्हत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘भारत’ शब्दालाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे.
यापुढे आता NCERTच्या पुस्तकात इंडिया ऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे. NCERT पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत. याशिवायया आणखी एक बदल करण्यात आला आहे. प्राचीन इतिहास या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास हा शब्द वापरण्यात येणार आहे.