मुंबई – सरलेल्या पंधरवड्यामध्ये भारताच्या चलनाची किंमत बरीच कमी झाली आहे. त्यामुळे भारताकडे उपलब्ध असलेल्या परकीय चलनाच्या साठ्याच्या मूल्यात घट झाली आहे.
3 डिसेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार भारताकडे 635 अब्ज डॉलर एवढा परकीय चलनाचा साठा होता. त्या अगोदरच्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये एक अब्ज डॉलरची घट झाली आहे.
अमेरिका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचा भाव वधारत आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी झाले असल्याचे दिसून येते. भारताकडे सध्या 38 अब्ज डॉलरच्या सोन्याचा साठा आहे.