नवी दिल्ली :– पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे मोठे पथक रवाना होणार आहे. या पथकात एकूण 446 व्यक्ती असून त्यात 303 ऍथलीट्स आहेत. ही स्पर्धा येत्या 22 ते 28 या कालावधीत होत असून 191 पुरुष खेळाडू तर 112 महिला खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय खेळाडू एकूण 17 क्रीडा प्रकारात सहभागी होणार असून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 143 प्रशिक्षकांनाही खेळाडूंबरोबर पाठवण्यास परवानगी दिली आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताचे हे पहिलेच इतके मोठ्या संख्येचे पथक सहभागी होत आहे.
Team India will send its largest-ever delegation for the upcoming Hangzhou Asian Para Games with 309 athletes in 17 different events.#Hangzhou #AsianParaGames #HangzhouAsianParaGames #4thAsianParaGames #Hangzhou2022APG #TeamIndia @asianparalympic @WeAreTeamIndia pic.twitter.com/nNnTqs0WsF
— The 4th Asian Para Games Hangzhou Official (@19thAGofficial) October 17, 2023
2018 साली जकार्तामध्ये झालेल्या स्पर्धेत 190 खेळाडूंनी 13 क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला होता. त्यावेळी भारताने एकूण 72 पदके मिळवली होती. ज्यात 15 सुवर्णपदके, 24 रौप्य पदके आणि 33 कांस्यपदकांचा समावेश होता.