Devendra Fadnavis – ड्रग माफिया ललित पाटील पलायण प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हॉटेल लेमन ट्रीमध्ये (Hotel Lemon Tree) उद्या (बुधवार) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उतरणार आहे. ते येथील एका कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत.
यामुळे पोलीस आणि ससून प्रशासनाची ते तेथे झाडाझडती घेणार का? हा चर्चेचा विषय ठरणार आहे. फडणवीसांनी ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी प्रथमच एक प्रतिक्रिया दिली आहे.
ते नागपुर एअरपोर्टवर बोलताना म्हणाले, ललित पाटील जाणार कोठे ? त्याचा शोध घेतला जाणारच, त्याचे काही सहकारी पकडले आहेत, त्यालाही पकडू, ललित पाटील प्रकरणी राज्य सरकारमधील एका मंत्र्यावरही आरोपी होत आहेत.
तर दुसरीकडे ससूनचे प्रशासन आणि डीनही अडचणीत आले आहे. ललित पाटील ससूनमधून पळाल्यावर हॉटेल लेमन ट्रीमध्ये तासभर थांबला होता.