कोणत्याही नेत्याकडे एखाद पद कधीही येऊ शकते, मात्र त्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी करण्याची किमया ज्याच्या मनात अन् हातात असते तोच खरा किमयागार असतो. जनतेचं भलं करायचं या इर्षेने राजकारणात पाऊल ठेवलेला नेता नामदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून मिळालेल्या सर्व पदांचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करून त्या संधीचे अक्षरशः सोने करून दाखवले आहे.
केवळ कामाच्या जोरावर भरणे यांनी सलग दोनदा इंदापूर तालुक्याची विधानसभा जिंकल्यामुळे सरकारमध्ये त्यांना महत्त्वाच्या सहा खात्यांची राज्यमंत्री म्हणून व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र राजकारणात ही वादळी संकट दिसलं तरीदेखील, पदासाठी कधीही मला.., मला.. असा आग्रह न ठेवता दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय व मदत करणे, हेच सूत्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवलंबविले.
इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्यात आपल्या कामाच्या जोरावर तालुक्यातील महत्त्वाची असणारी प्रशासकीय इमारत यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून पुणे जिल्हा आदर्श प्रशासकीय इमारत इंदापूर येथे दिमाखदार उभी केली आहे. नीरा नरसिंहपूर या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी दोनशे साठ कोटींच्या वर निधी खेचून आणून दक्षिण प्रयोग म्हणून नीरा नरसिंहपूर परिसराचा विकासात्मक चेहरामोहरा बदलण्याची भूमिका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली. राज्यमंत्री पदाचा पदभार नामदार दत्तात्रय भरणे यांनी काही महिन्यांपूर्वी हाती घेतला आहे. मात्र राज्याचा कारभार सांभाळताना तालुक्यात कोणत्याही विभागाला निधी कमी पडू नये, लोकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी भरणे यांनी तब्बल 120.53 कोटींची विकास कामे मंजूर करून घेतली आहेत.
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत 10.98 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 42 लाख रुपये निधी खेचून आणला आहे. ग्राम विकास विभाग अतर्गत तातुक्यातील विविध विकासकामे 3054 लेखाशिर्ष अर्तगत 6.20 कोटी रुपयांची कामे मार्गी लागणार आहेत. अनेक वर्षापासून उपेक्षित असणाऱ्या गावांच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग अंतर्गत तालुक्यातील विविध विकास कामे 2515 लेखाशिर्ष अंर्तगत 4 कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यांवर राज्यमंत्री भरणे यांनी भर दिला आहे. ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते, परिपक्व होतात. लोकांना सेवा उपलब्ध होते. याच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अध्यावत कार्यालय पूर्ण करण्यासाठी इंदापूर येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय इमारतीचे बांधकामासाटी 164 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागाचे कार्यालय अनोखे भर घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील नवीन रस्त्यांसाठी अर्थ संकल्पीय बजेट मंजूर कामे 91.77 कोटींची कामे करुन घेतली आहेत.
जी योजना इंदापूर तालुक्यातील कोणत्याही गावांना माहिती नव्हती. ती वसंतराव नाईक तांडा योजनेअंतर्गत तांडावस्ती सुधारणा करण्यासाठी तब्बल 50 लाख निधी खेचून घेण्याची किमया राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी करून दाखवली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत दलित वस्ती सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत.अल्पसंख्याक विभाग अंतर्गत मुस्लीम समाज दफन भुमी सुधारणा करण्याची मागणी मुस्लीम बांधवांची असल्यामुळे, या कामासाठी शासनाकडून एक कोटीचा निधी तालुक्याला मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विविध रस्ते 95 कोटी निधी तालुक्यात आणल्यामुळे तालुक्यातील सर्व रस्ते अद्ययावत बनणार आहेत.
इंदापूर नगर परिषद हद्दीतील भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांनी तब्बल दहा कोटींचा निधी शासनाकडून नगरपालिकेला मिळवून दिला आहे. त्यामुळे सुंदर व स्वच्छ इंदापूरमध्ये विकासकामे सुंदर होणार हे मात्र निश्चित. त्यामुळे इंदापूर तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करण्याचे सत्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुरू ठेवले आहे. समाजोपयोगी, लोकोपयोगी कामांचा धडाका तर अवर्णनीय आहे. विकास कामांच्या माध्यमातून नामदार दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील लहान थोरांच्या मनात कायमच आदराचे प्रेमळ स्थान निर्माण केले आहे. इंदापूर तालुक्याच्या अशा या पोलादी विकास पुरुषास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा….
शब्दांकन : नीलकंठ मोहिते, इंदापूर तालुका प्रतिनिधी