बीड: मराठवाड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, गुरुवारी पाठवण्यात आलेल्या 41 अहवालांमध्ये पाच रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. बुधवारी एका पॉझिटिव्ह रुग्णामुळे बीड शहर आणि परिसरातील बारा गावे पूर्णत: लॉकडाऊन करावे लागले त्यातच आता पुन्हा या पाच जणांची भर पडली आहे. आता बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 61 वर गेली आहे.
बीड जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. गुरुवारी पाठवलेल्या 41 स्वॅब पैकी 5 जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोविड 19/बीड/ अपडेट /28 मे 2020
आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या– ४१
पॉजिटिव्ह अहवाल—५
निगेटिव्ह अहवाल — ३६
रुग्ण आढळलेल्या गाव व तालुका
1 – पाटोदा शहर
1 – धारूर
3 – कारेगाव ता पाटोदा