वाघोली (प्रतिनिधी) : शासन निर्णय अन्वये पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखालील लोणीकंद व लोणी काळभोर हे दोन पोलीस ठाणे पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे अधिनस्त कार्यक्षेत्रात सामाविष्ट करण्यात आली आहेत. या अनुषंगाने दि. 23/3/2021 पासुन सदर दोन्ही पोलीस स्टेशन पुणे पोलीस आयुक्तालयात प्रत्यक्ष समाविष्ट होवुन कार्यन्वीत झालेली आहेत.
नव्याने समाविष्ट झालेल्या पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र व दाखल गुन्हे विचारात घेवुन सदर भागातील गुन्हेगारी रोखणेसाठी तसेच दाखल गुन्हयांची तात्काळ उकल करण्याचे उद्देशाने या कार्यक्षेत्राकरिता मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी गुन्हे शाखेचे नवीन युनिट -6 निर्माण केले आहे.
नवनिर्मित गुन्हे शाखा युनिट -6, चे कार्यालय हे वाघोली येथील गट क्र. 1203 मधील आर पी एस हेरीटेज, समृध्दी स्केअर्स, बायफ रोड, वाघोली ता.हवेली जि. पुणे. येथे स्थापन करण्यात आले असुन सदर कार्यालयाचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे हस्ते फित कापुन व दीप
प्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम हा मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अशोक मोराळे, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे 1, सुरेंद्रनाथ देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन गजाजन पवार, गुन्हे शाखेचे अधिकारी व गुन्हे शाखा, युनिट- 6चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील व अंमलदार तसेच पत्रकार बांधव व स्थानिक नागरिक यांचे उपस्थितीत पार पडला.