वाघोली – गोव्यातील परणेम येथील पत्रादेवी गोवा पोलीस चेक पोस्ट समोर कार कंटेनरला धडकल्याने एक जण मृत्यूमुखी तर नऊ जण जखमी झाले. हे सर्व जण वाघोली परिसरातील असल्याचे समजते. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास घडली.
जखमींवर गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी मध्ये पाच बालकांचा समावेश आहे. कांतीलाल विठ्ठल शिंदे (वय ४७, रा. वाडेबोल्हाई) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात वाघोली येथील श्रीराम तुकाराम बनकर, प्रवीण बळीराम दशदे, बळीराम दिगंबर दशदे, मनीषा बळीराम दशदे, प्रतिभा बळीराम दशदे, प्रिया बळीराम दशदे, ओमकेश्वर चंदकांत डोईवड, विनायक राम बनकर, पपिता राम बनकर, प्रजिली राम बनकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मारुती इको कार मध्ये हे १० जण होते. कार कंटेनरला जाऊन धडकली. कारचा पुढचा भाग पुर्णपणे चेपला गेल्याने या अपघातात शिंदे यांचा मृत्यु झाला. इतर नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमी दोन कुटुंबातील आहेत. गोवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांचे नातेवाईक गोवा येथे पोहचले आहे.