‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ : यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा १२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी

तीन दिवसांत ३४ जण बरे होऊन घरी

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना आरोग्य पथकाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येईल. विशेष म्हणजे गत तीन दिवसांत एकूण 34 जण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यासाठी व प्रशासनासाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 51 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन जणांचा रिपोर्ट नव्याने पॉझिटिव्ह आल्याने ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63 वरून 65 वर गेली. मात्र सोबतच 12 जणांचे रिपोर्ट 14 दिवसांच्या कालावधीनंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 53 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 62 जण भरती आहेत.

सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 49 नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरिता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 1569 आहे. यापैकी 1519 नमुन्यांचे अहवाल प्राप्त तर 50 अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह नमुन्यांची संख्या 1422 आहे, असे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात 53 तर गृह विलगीकरणात एकूण 1272 जण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.