खंडेरायवाडीत झेंडूची फुले शेतातच तोडून फेकली

साकुर  -लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. सध्याच्या काळात शेतात असलेली पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. इतर वेळी मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांना मागणी असते. फुल व्यापारी फुलांची खरेदी करतात. मात्र, यंदा करोनाच्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात झेंडूची लागवड केली होती. पण मागणी नसल्याने शेतकऱ्याने शेतातील फुले तोडून फेकली आहेत.

संगमनेर तालुक्‍यातील खंडेरायवाडी येथील शेतकरी जयराम धोंडिबा ढेरंगे यांनी एकरमध्ये केलेली झेंडूची शेती सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संकटात सापडली आहे. मात्र, तोडणीस आलेले एकही झेंडुचे फुल बाजारात विक्रीला न नेता स्वत:च्या डोळ्यासमोरच शेतातच तोडून फेकण्याची वेळ आल्याने लाख रूपये उत्पन्नाची झळ बसली आहे. फेब्रुवारी महिन्यात जयराम ढेरंगे या शेतकऱ्याने एकरमध्ये एक हजार झेंडुुुची रोपे लाख रूपयांना खरेदी करून लागवड केली होती. शेततळ्याच्या पाण्यावर झेंडुची रोपे जगवून शेती उभारली. चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षाही होती. यामध्ये रोपे, मलचिंग पेपर, खते, खुरपणी, मजुरी, फवारणीसाठी लाख रूपये खर्च करत झेंडुची शेती चांगल्या प्रकारे फुलवली होती.

चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्याला होती. मात्र अचानक जगाबरोबर देशावर करोनाचे आलेले संकटात शेतकरी सापडला आहे. नगदी पीक म्हणून झेंडू शेतीकडे पाहिले जाते. देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व मार्केट, बाजारपेठा, धार्मिक मंदिरे, लग्न, व्यापार आदि बंद असल्याने झेंडुची फुलांना सध्या कवडीमोल किंमत सुद्धा मिळत नसल्याने शेतातच फुले तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.अमाप खर्च झाल्याने आता लॉकडाऊन कधी संपेल याचीच वाट शेतकऱ्याला बघायची वेळ आली आहे.

नगदी पीक म्हणून झेंडू शेती केली, परंतु करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने झेंडूची फुले शेतातच तोडून फेकावे लागत आहे. लाखो रूपये खर्च झाला आहे. एप्रिलनंतर जर कदाचित लॉकडाऊन संपून सुरळीत चालू झाले तरच खर्च वसूल होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र लॉकडाऊन पुढे वाढला तर एकर झेंडूची शेती सोडून नांगरून टाकणे हाच एकमेव पर्याय आहे.
जयराम ढेरंग शेतकरी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.