पुणे – शहरात करोना बाधितांचा आकडा दररोज तीन ते चारने वाढतच आहे. बुधवारी (दि. 1) शहरात आणखीन तीन करोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील दोन नायडू तर, एक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहे.
एकीकडे पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत दाखल झालेल्या रुग्णांपैकी सात जणांना घरी सोडले आहे. मंगळवारी (दि. 31) नायडू रुग्णालयातील आणखीन एका व्यक्तीचा 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यांची दोनवेळा नमुने तपासणी करण्यात आली. दोन्हीही नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडले. तसेच, खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या एका करोना बाधित महिलेचीही सुखरूप सुटका केली आहे.