Mumbai airport shut – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ उद्या, मंगळवारी 6 तासांसाठी बंद (Mumbai airport shut) ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही, अशी माहिती विमानतळ ऑपरेटरकडून देण्यात आली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावरील दोन रनवे मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई विमानतळावरील (Mumbai airport shut) दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.