पुणे – कॉसमॉस बँकेस (Cosmos Bank) सर्वोत्तम सहकारी बँक पुरस्कार, तसेच सर्वाधिक कर्जवाढ याबद्द्ल नुकतेच गौरविण्यात आले. फ्रंटियर्स इन को-ऑपरेटीव्ह बँकींग अवॉर्ड्स (FCBA) या संस्थेतर्फे सदर पुरस्कार मोठया सहकारी बँकांसाठी असलेल्या श्रेणीमध्ये कॉसमॉस बँकेस प्राप्त झाला.
नुकतेच या समारंभाचे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते. बँकेतर्फे हा पुरस्कार व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे व रिटेल क्रेडिटचे उपमुख्य महाव्यवस्थापक आनंद चाळके यांनी स्वीकारला.
कॉसमॉस बँकेस नुकताच बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड बँको ब्ल्यू रिबन २०२३’ हा आणखी एक मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रू. १५००० कोटींपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सदर पुरस्कार कॉसमॉस बँकेस प्राप्त झाला आहे.
बँकेच्या चीफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर आरती ढोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माजी मुख्य महाव्यवस्थापक डिर्पार्टमेंट ऑफ सुपरव्हिजन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी. के. अरोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.