गावागावांत नागरिक घेताहेत काळजी : रस्ते, बसस्थानक, बाजारपेठांमधील गर्दी रोडावली
पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात 16 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. या करोनाची भीती शहरासह जिल्ह्यातही पसरली असून जिल्ह्यातील गावागावांत फक्त करोनाची चर्चा आहे.
तर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी गावागावांत करण्यात येत असून नागरिक एकमेकांना धीर देत आहेत.
तर गरज नसल्याने घरातून बाहेर पडण्याचेही टाळत असल्याने गावागावांतील रस्ते, मुख्य ठिकाणे, बाजारपेठा, बसस्थानक, थांब्यावरील गर्दी रोडावली आहे असल्याने भीतीपेक्षा नागरिक काळजी घेताना दिसत आहेत.