राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले
मुंबई: राज्यातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली मात्र आज झालेल्या सुनावणीत कोणताही निर्णय न्यायालयाने दिला नाही. तसेच या प्रकरणावर आता उद्या सकाळी पुन्हा एकदा सुनावणी करत अंतिम निर्णय देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एकीकडे न्यायालयाच्या घडामोडी होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना एका कार्यकत्याने सुनावले आहे. यावेळी त्याने तुम्ही सुद्धा पवारसाहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन. कारण उत्तर तुम्हाला नाही आम्हा कार्यकर्त्यांना द्यावं लागतं, अशा शब्दात एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना सुनावले आहे.
साहेब मी स्वतः काल तुम्हाला 7-8कॉल केले नॉट रीचेबल लागत होता तुमचा फोन किती टेन्शन घेतलं मी काल पासून हे फक्त माझ्या घरच्या ना माहीत तुम्ही सुद्धा पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेन कारण उत्तर तुम्हाला नाही ओ कार्यकर्त्यांना द्यावे लागत
— Siddhesh Nikam Patil (@NikaSi_SiD) November 24, 2019
अजित पवार यांच्या शपथविधीवेळी तिथे 11 आमदार उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे देखील होते. धनंजय मुंडे यांचा फोन दिवसभर बंद होता. यानंतर ते अजित पवारांसोबत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडे आले. तसेच त्यांनी ट्विट करत मी पवारांसोबत, पक्षासोबत असल्याचं स्पष्ट केलं.
धनंजय मुंडे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत एका कार्यकर्त्यांने धनंजय मुंडेंना सुनावलं आहे. साहेब मी काल तुम्हाला 7-8 वेळा फोन केला. पण तुमचा फोन नॉट रिचेबल लागत होता. मी कालपासून किती टेंशन घेतलं हे माझ्या घरच्यांनाच माहिती, असं त्या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. दरम्यान, या कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.