भोपाळ – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि पक्षामध्ये सुरू असलेला संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावरून राजकीय नाट्य सुरु होते. यादरम्यान अनेक वेळा ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेस पक्षावरील नाराजी दिसून आली होती. परंतु, काँग्रेससोबत अनेक दिवसांपासून असलेला वाद आज ज्योतिरादित्य शिंदे यांनी संपुष्टात आणला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचे नाव काढले आहे. त्याऐवजी आता शिंदेंनी स्वतःचा समाजसेवक आणि क्रिकेटप्रेमी असा उल्लेख केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jyotiraditya Scindia to ANI, on no mention of Congress party in his Twitter bio: A month back I had changed my bio on Twitter. On people’s advice I had made my bio shorter. Rumours regarding this are baseless. pic.twitter.com/63LAw9SIvb
— ANI (@ANI) November 25, 2019
दरम्यान, मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्याची मागणी मध्यप्रदेशमधून होत होती. यादम्यान ज्योतिरादित्य शिंदे भाजपात प्रवेश करणाच्या चर्चांनाही उधाण आले होते. परंतु, त्यांनी या चर्चांना अफवा असल्याचे म्हंटले होते.