सुशांतसिंहच्या आत्महत्ये इतकी चर्चा सर्वसामान्यांबाबत झाली तर प्रश्न सुटतील- राजू शेट्टी

कोल्हापूर –   सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या बॉलीवूडसह राजकारण आणि पोलीस प्रशासन ढवळून निघाले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यावरून राजकारण तापत असताना आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

दरम्यान,आत्महत्या करणारा कोण आहे, हे बघून चर्चा होणार असेल तर आपण कुठे निघालो आहोत. सुशांतच्या आत्महत्येवर जितकी चर्चा होते तेवढी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली तर किमान प्रश्न सुटतील, असेही शेट्टी म्हणाले आहेत.

शेट्टी पुढे म्हणाले, लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किती झाल्या याची आपण चर्चा करणार आहोत की नाही? एका बाजूला सामान्य माणसाला रुपया चाकाएवढा मोठा दिसतो, तर सुशांतसिंह प्रकरणात कोटीचे आकडे समोर येत आहेत.

हा प्रकार विचार करायला लावणारा आहे.सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या बॉलीवूडसह राजकारण आणि पोलीस प्रशासन ढवळून निघाले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. यावरून राजकारण तापत असताना आता शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.