नगररचना सहसंचालकाच्या बेनामी मालमत्तेची होणार समांतर चौकशी

पुणे : राज्याच्या नगररचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे़.

त्यात २ कोटी ८५ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती. त्यानंतर विशेष पथकामार्फत केलेल्या प्राथमिक तपासात त्यांची अनेक ठिकाणी बेनामी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. या मालमत्तेचा आकडा मोठा असल्याचा संशय आहे. त्यामुळे याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयकर विभागाला दिली असून, आयकर विभागाच्या बेनामी मालमत्ता शाखेकडून या प्रकरणाची समांतर चौकशी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.