नवी दिल्ली – सोने आणि चांदीचे भाव खाणे चालूच आहे. सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 56,120 रुपयांवर गेले. सोन्याचे दर कालच्या तुलनेत 240 रुपयांनी वाढून 56,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आले.
त्याचबरोबर तयार चांदीचे दर 960 रुपयांनी वाढून 76,520 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले.
जागतिक बाजारातील भांडवल सुलभता आणि कमकुवत डॉलरमुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर एकतर्फी वाढत आहेत. त्यामुळे भारतीय सराफातही या दोन धातूंचे दर वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन्ही धातूचे दर सध्या विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहेत.