केवळ योगयोगच म्हणायला हवा की राष्ट्रीय स्तरावरील अनेक बड्या नेत्यांचे विचार परस्परांशी जराही मिळतेजुळते नाहीत, त्यांची मते आणि मने जुळत नाहीत, त्याचप्रमाणे त्यांचे रक्तगटही समसमान नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधी, मायावती आदींचे रक्तगट वेगवेगळे आहेत. मोदींचा रक्त गट ए पॉझिटिव्ह आहे; तर राहुल गांधींचा बी निगेटिव्ह आहे. यंदाच्या निवडणुकांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधींचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे.
रक्तगटांबाबतचे एक भन्नाट निरीक्षण नुकतेच समोर आले आहे. त्यानुसार बिहारच्या राजकीय आखाड्याम्ये उतरलेल्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांचे रक्तगट हे दोनच प्रकारचे आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, रवी शंकर प्रसाद, सुशीलकुमार मोदी यांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. तर माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव, खासदार चिराग पासवान आणि बिहार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांचा रक्तगटही ओ पॉझिटिव्ह आहे.
उत्तर प्रदेशामध्ये 25 वर्षांपासून चालत आलेले वैरत्व संपवून भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी गठबंधन तयार करणाऱ्या अखिलेश यादव आणि बसपाच्या सुप्रिमो मायावती यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांचाही रक्तगट बी पॉझिटिव्हच आहे.
याखेरीज राजनाथ सिंह यांचा ए पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांचा एबी पॉझिटिव्ह, सोनिया गांधींचा बी निगेटिव्ह, मुरली मनोहर जोशींचा बी पॉझिटिव्ह, अमरसिंहांचा बी पॉझिटिव्ह, उमा भारतांचा एबी पॉझिटिव्ह; तर लालकृष्ण आडवाणींचा ओ पॉझिटिव्ह रक्तगट आहे.