नवी दिल्ली :- आयसीसीच्या पुरुष टी-20 विश्वकरंडक आशिया पसिफिक पात्रता स्पर्धेत फिलीपिन्सचा वेगवान गोलंदाज केपलग लुकीजने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 5 बळी घेणारा सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला आहे.
16 वर्षे आणि 145 दिवस वय असलेल्या केपलगने वानुअतूविरूद्धच्या सामन्यात 5 बळी घेत ही ऐतिहासिक कामगिरी केली. अर्थात त्याच्या या कामगिरीनंतरही फिलिपिन्सला वानुअतूविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
फिलीपिन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 94 धावा केल्या होत्या. त्यात केपलगने 10 धावा देत 5 गडी बाद केले. वानुअतूने 95 धावा करत हा सामना जिंकला. सामना गमावला असला तरीही पिलीपिन्सच्या केपलगच्या विक्रमाने हा सामना चर्चेत राहिला.
यापूर्वी ही कामगिरी सिआरा लियोनच्या सॅम्युअल कोंटेहच्या नावावर होती. त्याने 18 वर्षे आणि 29 दिवस वय असताना 2021 साली नायजेरियाविरूद्ध 5 बली घेतले होते. तसेच अफगाणिस्तानच्या लेगस्पिनर राशिद खानने 2017 साली आयर्लंडविरूद्ध 5 बळी घेतले होते. त्यावेळी त्याचे वय 18 वर्षे 171 दिवस होते.