कोलोंबो – भारतीय हवाई दलाच्या एअरोबॅटीक पथकाचे लढाऊ विमान तेजस सह फिक्स्ड विंग सूर्यकिरण आणि रोटरी विंग ‘सारंग’ ही विमाने, शनिवारी कोलंबो येथे दाखल झाली. श्रीलंकेच्या हवाई दलाच्या 70 व्या वर्धापन दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्रीलंका हवाई दलाचे एअर मार्शल सुदर्शन पथीराणा यांनी भारतीय हवाई दलाला आमंत्रण दिले होते.
श्रीलंकेच्या वायू दलाच्या 70 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या भाग म्हणून सूर्यकिरण, सारंग आणि एलसीए तेजस यांचे पथक 3 ते 5 मार्च 2021 दरम्यान गॅले फेस, कोलंबो येथे होणाऱ्या एअर शोमध्ये भाग घेतील.
भारतीय हवाई दल आणि श्रीलंका हवाई दल यांच्यात प्रशिक्षण, व्यवहार्य आदानप्रदान आणि व्यावसायिक लष्करी शिक्षण अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अनेक वर्षे सक्रिय देवाणघेवाण आणि परस्पर संवाद सुरू आहे.
श्रीलंकेच्या हवाई दलाच्या 70 व्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये भारतीय हवाई दलाचा सहभाग हा दोन हवाई दलातील मजबूत व्यावसायिक संबंधांचे द्योतक आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने यापूर्वी 2001 मध्ये श्रीलंकेच्या हवाई दलाच्या 50 व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये भाग घेतला होता.