विधानसभा अध्यक्ष कॉंग्रेसचाच होणार – नाना पटोले

मुंबई – विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक काही आमदार मंत्री करोना पॉझिटिव्ह असल्याने घेता येणार नाही. पण हे पद कॉंग्रेसकडेच राहणार आहे. तसेच करोनाची भीती कमी हो असल्याचे दिसून आल्यास या अधिवेशनातही निवडणूक होउ शकते, असेही संकेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

तसेच कॉंग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळत नाहीत अशा तक्रारी तुमच्या माध्यमातून माझ्या कानावर आल्या. पण त्या बाबतीत आम्ही जो काही दम द्यायचा तो दिला आहे. हा दम योग्य जागी पोहोचलेला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर याचे उत्तर तुम्हाला याच अधिवेशनात मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नाना पटोले यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. कॉंग्रेसच्या बाबतीत जेव्हा असे आरोप झाले होते, तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी, असे वक्तव्य पटोले यांनी केले. यावेळी भाजपकडून होत असलेल्या आरोपांचाही पटोले यांनी समाचार घेतला.

भाजपला घाई झाली आहे, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पूजाचे कुटुंबीय सुद्धा ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो चौकशीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेतील, असा विश्वास असल्याचे पटोले यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.