मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेमध्ये १ मे रोजी आपण औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या सभेसाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये ९ तारखेपर्यंत जमावबंदीचे प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्वात मनसेकडून औरंगाबादच्या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअऱ केला आहे. मनसेने टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.
चला संभाजीनगर pic.twitter.com/AE06KuFwb7
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 26, 2022
ज्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी रमजान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असे सुचवले आहे. त्यामुळे ही सभा होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
अजान ची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालीसा ला विरोध करणारे नव पुरोगामीच.आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच. आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी "बुंदसे गयी वो हौद से नहीं आती"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 26, 2022
तर दुसरीकडे संदीप देशपांडे यांनी आणखी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे, यामध्ये देशपांडे यांनी,”अजानची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालिसाला विरोध करणारे नव पुरोगामीच आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच. आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी “बुंदसे गयी वो हौद से नहीं आती”,” असा टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.