Madhavi Latha Controversy: – भारतीय जनता पार्टीच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे येथे राजकीय वादंग सुरू झाला आहे. रामनवमी निमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी झालेल्या माधव लता एका धार्मिक स्थळावर काल्पनीक बाण सोडताना व्हिडिओत दिसते आहे. त्यावरून एमआयमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे.
कल श्री राम नवमी के पावन पर्व के उपलक्ष में “भाग्यनगर श्री राम नवमी उत्सव समिति” के द्वारा गोशामहल विधानसभा में आयोजित शोभा यात्रा कार्यक्रम में हिस्सा लिया जिसमे मेरे सभी छोटे और बड़े बहन भाइयों का जोश देखने लायक़ था।
प्रभु श्री राम हम सभी के जीवन को सुख समृद्ध बनायेंगे 🙏 pic.twitter.com/DGvhCwGPUh
— Kompella Madhavi Latha (Modi Ka Parivar) (@Kompella_MLatha) April 18, 2024
भारतीय जनता पार्टीचा इरादा काय आहे हे हैदराबादच्या लोकांनी पाहिले आहे. ते भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चुकीचा व्यवहार स्विकारणार नाहीत. हे सरळ सरळ चिथावणी देणारे कृत्य आहे. भाजप यालाच विकसित भारत म्हणतो का? निवडणुकीपेक्षा हैदराबाद येथील शांतता महत्वाची आहे. त्यामुळेच जे शांततेच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात तेलंगणाची जनता मतदान करेल असा मला विश्वास आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
माधवी यांनी मागितली माफी –
माधवी लता यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले की समाजात नकारात्मकता पसरवण्यासाठी माझा एक व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचे माझ्या ध्यानात आले आहे. मात्र हा एक अर्धवट व्हिडिओ आहे हे मी स्पष्ट करू इच्छीते. तथापि, त्यामुळेही जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते कारण मी सगळ्यांचा आदर करते.