शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मधील बामणोली परिक्षेत्रातील वलवण नियतक्षेत्रात फासा लावून साळींदर या अनुसूची 4 मधील वन्यप्राण्याची शिकार झाल्याच्या गुप्त बातमी वरून महादेव कोंडीराम जाधव व पांडुरंग महादेव जाधव (रा. उगवतीवाडी वलवण) या संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काल (दि. 13) त्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांचे समोर हजर केले असता 5 दिवसाची वनकोठडी मिळाली आहे. प्रकरणी पुढील तपास चालू आहे.
सदर कारवाई एम.एन. मोहिते, उपसंचालक स.व्या.रा. कोल्हापूर स्थित कराड, एस.सी. साळुंखे, सहा. वनसंरक्षक कोयना यांचे मार्गदर्शनाखाली बी.डी. हसबनिस वनक्षेत्रपाल बामणोली, एस.एस. कुंभार वनपाल वलवण(अतिरिक्त कार्यभार), एस. एस. शेंडगे वनरक्षक वलवण, ए. बी. सावंत वनरक्षक आरव, सुमित चौगुले वनरक्षक वाघावळे, आर. व्ही. भोपळे वनरक्षक र.घाट नाका, आर. एस. आवारे वनरक्षक कारगाव यांनी केली.
वलवण सदर बीट मध्ये ज्यांनी ही शिकार व शिकारी हुडकून काढले ते वनरक्षक स्वप्नील शेंडगे अभियंता व MBA असून ते वळवण सारख्या अतिदुर्गम नियतक्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत.
शिकारी बाबत कोणत्याही माहिती असल्यास वनविभागास माहिती कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठवले जाईल व बक्षीस ही दिले जाईल.असे आवाहन करण्यात आले आहे.