ह्रतिक रोशनच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह

मुंबई- अभिनेता ह्रतिक रोशनची आई पिंकी रोशन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांनी नुकतंच 67 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

मला या आजाराची कोणतीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी मला रुग्णालयात न राहता घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. सातव्या दिवशी म्हणजेच उद्या, कोविड -19 ची टेस्ट पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

मी आयसोलेशनमध्ये असतनाही माझ्या कुटुंबीयांनी मला खूप छान सरप्राईज दिलं. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही पिंकी रोशन वाढदिवसाचा पूर्ण आनंद घेत आहेत. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. फक्त खबरदारी घ्या असेही शेवटी पिंकी रोशन म्हणाल्या.

दरम्यान, घरातील सर्व व्यक्तींना बाधा झाली नाही. हृतिक रोशन गेल्या काही वर्षांपासून आई-वडिलांपासून विभक्त जुहू येथील प्राइम बीच येथे राहत आहे. त्यामुळे कुटुंबीय सुरक्षित असल्याचं समजतं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.