बेपत्ता पाषाणकरांकडे ५० हजारांची रोकड

पुणे – शहरातून बेपत्ता झालेले  उद्याोजक गौतम पाषाणकर यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. 

पाषाणकर यांच्याकडे पन्नास हजारांची रोकड असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्यानंतर अद्यापही त्यांचा शोध लागू शकला नाही.

पोलिसांची पाच पथके तपास घेत असतानाही तपासात अद्याप कोणतीच प्रगती झाली नाही. पाषाणकर यांच्या तपासासंदर्भात पोलिसांकडून माध्यमांना कोणताही प्रतिसाद दिला जात नाही.

दरम्यान पाषाणकर हे विद्यापीठाच्या गेट पर्यंत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे. मात्र त्यापुढील कोणतेही फुटेज मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गौतम पाषाणकर यांनी त्यांच्या चालकाकडे सुसाईड नोटस दिली होती. यामध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांची पथके सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रीक विश्‍लेषण, लॉज तसेच इतरही काही कारणांचा शोध घेत तपास करत आहेत.

दरम्यान मागील चार दिवसांत त्यांची कोणतीच खबर नसल्याने पाषाणकर यांचे कुटूंबीयही चिंतेत आहे. ते सुखरुप असतील याची आशा कुटूंबीय बाळगूण आहे. तर दुसरीकडे पोलिस तपासाच्या प्रगतीबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार देत आहेत. ऍड. उमेश मोरे यांचे अपहरण व हत्या प्रकरणात हात पोळल्याने शिवाजीनगर पोलिसांनी पाषाणकर यांच्या तपासाबाबत सावध भूमिका घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.