कंगना राणावतच्या हिंदू धर्म आणि राष्ट्रवादाचा भडका उडवण्याच्या शैलीला फॉलो केल्याबद्दल हृतिक रोशनला खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावरील युजर्स म्हणत आहे की, हृतिक स्वतःच्या फायद्यासाठी मंदिरांमध्ये पूजा करत आहे आणि कंगना ज्याप्रमाणे वागत असते त्याच प्रमाणे हृतिक सुद्धा धर्माभिमानी हिंदू असल्याचे भासवत आहे.
At one hand he is pretending to be a #Hindu for commercial benefit and on the other he is dating a radical #anti #Hindu like #SabaAazad. People can see though this #Hrithik. You don’t have to prove with each and every festival how big a #Hindu you are. It’s a deepfake. pic.twitter.com/7SmR5PkSiT
— Ravi Bhadoria (@ravibhadoria) November 10, 2023
नुकताच तिचा तेजस चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगना भगवान कृष्णाच्या दर्शनासाठी द्वारकाला पोहोचली होती. अशात हृतिक रोशन सलमान खानच्या आगामी चित्रपट टायगर 3 मध्ये कॅमिओ करणार आहे. अशात सोशल मीडियावर यूजर्स कंगनाच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचा आरोप करत हृतिकला टार्गेट करत आहे.
हृतिक रोशनची पूजा करतानाचे काही फोटो त्याच्या X अकाउंटवर शेअर करताना एका यूजरने लिहिले,’हा एक अचुक पॅटर्न आहे. त्याला हिंदू म्हणून पाहिले आणि गणले जावे असे वाटते. त्यात काही नुकसान नाही. एवढेच की, त्याने यापूर्वी कधीही असे केले नव्हते. ही कंगनाची प्रतिक्रिया आहे. कंगनाला हिंदू धर्माचे वेड आहे, असे म्हणणाऱ्यांनी लक्ष द्यावे. हे पूर्णपणे विरुद्ध आहे.
दुसर्या व्यक्तीने लिहिले,’ स्टार्सला वाटते की मंदिरात पूजा करून चित्रपटांना फायदा होईल. कंगनाची हुबेहुब नक्कल करणारा हृतिक’ असं म्हणत त्याला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर हिंदू धर्माच्या मुद्यावरून हृतिक रोशनची कंगनाशी तुलना होते आहे.
दरम्यान, हृतिक रोशन ‘टायगर 3’ मध्ये छोट्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोणसोबत त्याचा ‘फायटर’ही पाइपलाइनमध्ये आहे. याशिवाय ऋतिक ‘वॉर 2’मध्येही दिसणार आहे.