World Cup 2023 India vs Netherlands Match Toss Update : विश्वचषक 2023 च्या 45व्या सामन्यात आज भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होतील.
भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि 15 तारखेला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी आज भारतीय संघ सराव सामना म्हणून मैदानात उतरेल. त्याचवेळी नेदरलँडचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तो सध्या शेवटच्या स्थानावर आहे. अशा स्थितीत संघ भारताला काही आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला आहे. नेदरलँड संघातही कोणताही बदल झालेला नाही.
India won the toss and elected to bat first in the final #CWC23 group clash 🏏#INDvNED 📝: https://t.co/fzawKvYsh5 pic.twitter.com/X6Ed536AgK
— ICC (@ICC) November 12, 2023
या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करायची आहे. रोहित शर्मा द्विशतक करू शकतो आणि विराट कोहलीही 50 वे वनडे शतक झळकावू शकतो.