पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राने झारखंडविरुद्ध ४ बाद ५४३ असा धावांचा डोंगर उभारला. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव याने दीडशतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देत अंकित बावणेने व त्यापूर्वी सलामीवीर पवन सिंगनेही शतक फटकावले. रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बावणे ११४ धावांवर खेळत असून अझीम काझी २ धावांवर खेळत आहे. झारखंडने पहिल्या डावात ४०३ धावा केल्या होत्या. आता महारष्ट्राकडे १४० धावांची आघाडी आहे.
-पवन शहा व अंकित बावणेचीही शतके
-महाराष्ट्र 4 बाद 543
– महारष्ट्राकडे १४० धावांची आघाडी
महाराष्ट्राने शनिवारच्या १ बाद १४९ धावांवरून पुढे खेळ सुरु केल्यावर पवनने दमदार शतक साकार केले. त्याने नौशाद शेखसह शतकी भागीदारी करत संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. नौशाद ७३ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केदार जाधवने पवनला साथ देत शतकी भागीदारी करत संघाला अडीचशे धावा फलकावर लावल्या. पवन शतक पूर्ण केल्यानंतर दीडशतक मात्र, साकार करु शकला नाही. तो १३६ धावांवर परतला. त्याने या खेळीत २२५ चेंडूत १४ चौकार व ३ षटकार फटकावले.
केदारने अर्धशतक पूर्ण केल्यावर शतकाकडे कूच केली. त्याला साथ देत बावणेनेही दमदार फलंदाजी केली. केदारने शतक पूर्ण केले व या जोडीने संघाचे त्रिशतक साकार केले. पाठोपाठ बावणेनेही अर्धशतक पूर्ण करताना संघाला चारशे धावांची मजल मारुन दिली. केदारने शतकापाठोपाठ दीडशतकही साकार केले. त्याला द्विशतक करण्याचीही संधी होती मात्र, तो १८२ धावांवर बाद झाला. मात्र, या जोडीने संघाच्या पाचशे धावा फलकावर लावताना संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. केदारने या खेळीत २१६ चेंडूत २१ चौकार व ५ षटकार फटकावले. दरम्यान बावणेनेही आपले शतक पूर्ण केले.
Stumps Day 3: Maharashtra – 543/4 in 131.6 overs (A N Kazi 2 off 11, A R Bawane 114 off 186) #MAHvJHA #RanjiTrophy #Elite
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 14, 2024
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो ११४ धावांवर खेळत असून अझीम काझीने नाबाद २ धावा केल्या आहेत. आता महाराष्ट्राकडे एकूण १४० धावांची आघाडी असून सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी आहेत. झारखंडकडून कर्णधार विराट सिंग, वरूण अरॉन व आशिष कुमार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवण्याची महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने मणिपुरचा एक डाव आणि ६९ धावांनी पराभव केला होता.
#FIHOlympicQualifiers2024 : ‘करो या मरो’च्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय….
संक्षिप्त धावफलक –
झारखंड पहिला डाव – सर्वबाद ४०३ धावा. महाराष्ट्र पहिला डाव – १३२ षटकांत ४ बाद ५४३ धावा. (केदार जाधऽ १८२, पवन शहा १३६, नौशाद शेख ७३, अंकित बावणे खेळत आहे ११४, अझीम काझी खेळत आहे २, विराट सिंग १-२०).