FIH Olympic Qualifiers 2024 : रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. FIH हॉकी ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने बलाढ्य संघ न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव केला आहे.
या विजयामुळे FIH महिला हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने उपांत्य फेरीच्या आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रविवारी दिवसाचा शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. पहिल्या सामन्यातील पराभव विसरून भारताने सामन्याच्या पहिल्याचा मिनिटाल गोल नोंदवून आपले इरादे स्पष्ट केले.
झारखंडच्या संगीता कुमारीने न्यूझीलंडचा बचाव भेदत अप्रतिम मैदानी गोल केला. न्यूझीलंडने पलटवार करत सामन्याच्या 9व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरव्दारे गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडकडून मेगन हलने गोल केला. त्यानंतर आक्रमक खेळ करत भारताने 12व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतासाठी उदिताने दुसरा गोल केला. त्यानंतर नेहाने(ब्युटी डुंगडुंग) 14व्या मिनिटाला भारतासाठी तिसरा गोल केला. तिने न्यूझीलंडचा बचाव मोडून मैदानी गोल करून 3-1 अशी आघाडी घेतली.
𝔸 𝕗𝕒𝕞𝕠𝕦𝕤 𝕨𝕚𝕟 𝕗𝕠𝕣 𝕋𝕖𝕒𝕞 𝕀𝕟𝕕𝕚𝕒!
With their backs against the wall, this was a must win game for them and our Girls showed us what are they made of!
A scintillating Q1 literally killed off the game for New Zealand.
3️⃣ Goals from Sangita, Udita and Beauty… pic.twitter.com/RmeuQ2OGHf
— Hockey India (@TheHockeyIndia) January 14, 2024
पहिल्या क्वार्टरमध्ये शानदार खेळ झाल्यानंतर उर्वरित तीन क्वार्टरमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. मात्र, दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही संघांना 5-5 पेनल्टी कॉर्नर मिळाले. झारखंडच्या सलीमा टेटेला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. संपूर्ण संघाने 100 टक्के कामगिरी केल्याचे तिने सांगितले. भारताचा पुढील सामना 16 जानेवारीला इटलीसोबत होणार आहे.
पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभूत….
पहिल्या सामन्यात कमकुवत संघ USA कडून पराभूत झाल्यानंतर भारतीय चाहते चांगलेच संतापले होते. त्याला आज नक्कीच शांतता मिळाली असावी. या विजयासह भारताने ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. भारताचा पुढील सामना आता मंगळवारी इटलीशी होणार आहे. भारत हा सामना कोणत्याही प्रकारे जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसरा विजय नोंदवून भारताचे लक्ष्य उपांत्य फेरी गाठण्याचे असेल.
#FIHOlympicQualifiers2024 : भारताची निराशाजनक सुरुवात; पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पराभव…
भारतीय महिला संघाचा शनिवारी FIH महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून 1-0 असा पराभव झाला. रांची येथील मरंग गोमके जयपाल सिंग अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला (16व्या सामन्याच्या मिनिटाला) अमेरिकेने गोल केला. अमेरिकेकडून सामन्यातील एकमेव आणि विजयी गोल अबीगेल तामारने 16व्या मिनिटाला केला. सामन्यात सहा पेनल्टी कॉर्नर मिळवूनही भारताला गोल करण्यात अपयश आले.