पुणे – पुण्यातील मानांकित आणि सर्वात जुन्या क्लबपैकी असलेल्या डेक्कन जिमखाना क्लब तर्फे ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशातील एकूण ८० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून स्पर्धेत एकूण एक लाख ७५ रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा १६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती डेक्कन जिमखाना क्लबचे बिलीयर्डस् विभागाचे सचिव विजय कदम व मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शंकर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युचल फंड यांनी प्रायोजित करून आर्थिक पाठींबा दिला आहे. स्पर्धेतील सामने हे साखळी आणि बाद फेरीत होणार असून प्रत्येक सामना हा बेस्ट ऑफ ३ फ्रेम्स् या पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण ८० खेळाडूंनी भाग घेतला असून ५ किंवा ६ खेळाडूंचा एक गट असे १६ गट तयार करण्यात आले आहेत.
स्पर्धेत एकूण १७२ साखळी सामने होणार असून त्यानंतर बाद फेरीचे सामने होणार आहेत, अशी माहिती समर खंडेलवाल यांनी दिली. स्पर्धेत पुण्यातील तहा खान, अभिजीत रानडे, आनंद रघुवंशी, विठ्ठल ढमाले, रोहन साकळकर, गौरव पतंगे, हसन सय्यद, सोनु मतंग, सुनिल अलगुडे, प्रशांत पवार, सचिन बिचे, मुंबईचे हसन बदामी, विजय नचानी, जेसन मल्होत्रा, विग्नेश संघवी आदि खेळाडू सहभागी होणार आहेत.
Sports In Pune : ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा थरार 16 जानेवारीपासून…
दिल्ली आणि पटणा या शिवाय पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लब, पीवायसी हिंदू जिमखाना, पुना क्लब, स्नुकर क्लब, क्यु क्लब, आरसीबीसी क्लब, कोरीयनथिन क्लब, टर्फ क्लब, पीजीआय क्लब, कॉनर्र पॉकेट क्लब अशा विविध क्लबमधील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.