Australian Open 2024 : ‘नोवाक जोकोवीच’ची विजयी सलामी…

Australian Open 2024 results (मेलबर्न) :- जागतिक टेनिसमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोवाक जोकोवीचने थाटात विजयी सलामी दिली. या स्पर्धेला रविवारी प्रारंभ झाला. पुरुष एकेरीत जोकेवीचने क्रोएशियाच्या डीनो प्रीमीकचा ६-२, ६-७, ६-३, ६-४ असा चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला व स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
या सामन्यात जोकोवीचने पहिला सेट सहज जिंकला मात्र, प्रीमीकने दुसरा सेट जिंकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर मात्र, त्याची लढत अपुरी ठरली व त्याने सलग दोन सेटसह सामनाही गमावला.
Idemooooooo 💪
Novak survives his 1st round in 4 hours
He defeated Prizmic 6-2 6-7 6-3 6-4 #novakdjokovic #AusOpen pic.twitter.com/wpphNANWm3— NovakDjokovicFanClub (@NovakFanClub) January 14, 2024
जोकोवीच या स्पर्धेचा संभाव्य विजेता मानला जात आहे. तो या स्पर्धेचा गतविजेताही आहे. स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने दुखापतीच्या कारणाने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे जोकोवीचला तशी तगडी स्पर्धा देणारा खेळाडू या स्पर्धेत सध्यातरी दिसत नाही.
#AsianOlympicQualifiers : नेमबाज योगेश सिंगची सुवर्ण कामगिरी…
अन्य लढतीत अमेरिकेचा स्टार खेळाडू फ्रान्सिस्को तैफुनेही विजयी सलामी दिली. त्याने पहिल्या फेरीच्या सामन्यात क्रोएशियाच्याच बोरना कोरीसवर ६-३, ७-६, २-६, ६-३ अशी मात केली.





