पुणे : सामाजिक भान जपत पुण्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव वी पुणेकर्स या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका युवतीने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची पोस्ट टाकल्यावर त्याची तात्काळ दखल घेऊन तिला सुखरूप घरी पोहोचण्यास मदत करणारे पुणे विशेष शाखेचे डीसीपी मितेश घट्टे, सिग्नल वरच्या मुलांना मारहाण करून त्यांना भीक मागायला लावणाऱ्या विरोधात कारवाई करणारे डेक्कन वाहतूक शाखेचे पीआय किरण बालवाडकर आणि नऱ्हेजवळ झालेल्या अपघात झाला त्यावेळी अनेक जखमी वाहनात अडकले होते, त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करून त्यांचा जीव वाचविणारे पीआय देविदास घेवारे व कॉन्स्टेबल गणेश झगडे या सर्वांचा सन्मान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, वी पुणेकर्स चे पराग मते, चांगुलपणाची चळवळ चे यशवंत शितोळे, जागृती ग्रुप चे रवींद्र भोसले, दिलीप शेलवंटे, मनीषा वाघमारे आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनाझेशन चे दिनेश कदम, अवधूत सूर्यवंशी असे विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.