कोपरगाव – आजपासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीसाठी कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे, निवडणुक शाखाधिकारी ए.डी.रनवरे यांनी तालुक्यातील प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.
गुरूवारी दुपारी २ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत कढण्याच्या कामकाजाला सुरूवात झाली. तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ सरपंच पदाचे दावेदार उपस्थित होते. त्यात ३८ ग्रामपंचायतीवर महीलांना सरपंच पदाचा मान मिळाल्याने या ठिकाणी महीला राज आले आहे.
अनुसुचित जातीसाठी १० ग्रामपंचायतीपैकी तिळवणी, माहेगाव देशमुख, कोकमठाण, चासनळी, मढी खु. या ५ ग्रामपंचायती महीला राखीव तर शिंगणापूर, मंजूर, मायगाव देवी, डाऊच बु.कारवाडी या ५ ग्रामपंचारती खुल्या प्रवर्गासाठी.
अनुसूचित जाती जमातीसाठी ११ ग्रामपंचायती त्यात देर्डे को-हाळे, शहाजापूर, पोहेगाव, ओगदी, वेस सोयेगाव, येसगाव या ६ ग्रामपंचायती महीलांसाठी तर रवंदे, कासली, दहेगाव बोलका, जेऊर कुंभारी, कान्हेगाव या ५ खुल्या प्रवर्गासाठी.
मागास प्रवर्गासाठी २० ग्रामपंचायती त्यात आपेगाव, सडे, मोर्वीस, चांदगव्हाण, घोयेगाव, शहापूर, कोळपेवाडी, गोधेगाव, डाऊच खु. रांजणगाव देशमुख या १० ग्रामपंचायतीवर महीला आरक्षण तर सांगवी भुसार, कोळगाव थडी, हांडेवाडी, करंजी बु., देर्डे चांदवड, चांदेकसारे, आंचलगाव, लौकी, मनेगाव, मुर्शतपूर या १० ग्रामपंचायती खुला प्रवर्गासाठी.
सर्वसाधारण गटासाठी ३४ ग्रामपंचायती :-
मळेगाव थडी, कुंभारी, सुरेगाव, वेळापूर, बक्तरपुर ,धारणगाव, जेऊर पाटोदा, उक्कडगाव, पढेगाव, तळेगाव मळे, वारी,खोपडी, सोनेवाडी, बहादराबाद, जवळके, अंजनापुर आणि संवत्सर या
१७ ग्रामपंचायती महीलांसाठी तर बोलकी, हिंगणी, काकडी मल्हारवाडी, धोत्रे, वडगाव, भोजडे,शिरसगाव सावळगाव, सोनारी, धोंडेवाडी, बहादरपूर, नाटेगाव, मढी बु., ब्राह्मणगाव, टाकळी, धामोरी, खिर्डी गणेश, घारी या ग्रामपंचायतीत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आल्याची माहीती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर केली.
दरम्यान, जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सवंत्सर ग्रामपंचायतीवर गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे गटाचे वर्चस्व असल्याने उपसरपंच विवेक परजणे यांना सर्वसाधारण गटातुन सरपंच पदाची लॉटरी लागली होती. मात्र शेवटच्या क्षणाला एका जागेसाठी चिठ्ठी काढण्यात आली आणि ती चिठ्ठी सवंत्सर ग्रामपंचायतीची महीला आरक्षणाची निघाल्याने परजणे यांचे सरपंच पदाचे स्वप्न अपुर्ण राहीले. तर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगाव येथील ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी अनुसुचित जमाती महीला आरक्षण पडल्याने तिथे त्या प्रवर्गाची महीला उमेदवार नसल्याने कोल्हे यांची कैंडी झाली. तर तिळवणी येथेही हीच स्थिती झाल्याने या दोन ग्रामपंचायतीचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहीती गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
सवंत्सर ग्रामपंचायत सरपंच पदासाठीच्या आरक्षणात चिठ्ठीतून महीला आरक्षण जाहीर होताच उपस्थित काळे कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन आनंद व्यक्त केला तर सरपंच पदाचे दिवेदार असलेले विवेक परजणे नाराजीच्या भाव व्यक्त करीत होते. दरम्यान ५० टक्के महीलांना गावचा कारभार चालविण्याची संधी आरक्षणाच्या माध्यमातून दिली मात्र आरक्षण सोडतीच्यावेळी तालुक्यातील एकही महीला या आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित नसल्याने महीलांचे आरक्षण केवळ नावाला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.