पुणे : सेंट मीरा महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. एकता अशोक जाधव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथुन शारीरिक शिक्षण या विषयातील विद्या वाचस्पती पदवी प्राप्त केली आहे.
एकता जाधव यांच्या संशोधनाचा विषय “अ स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ एन एक्सरसाइझ अँड लाईफ स्टाईल अवेरनेस प्रोग्राम ऑन द नॉलेज अँड हॅबिट ऑफ एक्सरसाइझ अमंग गर्ल्स फ्रॉम कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, दापोली ” असा होता.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय या संशोधन केंद्रातुन प्रा.एकता जाधव यांनी महाविद्यालयाचे संशोधन विभाग प्रमुख डॉ. महेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रबंध पुर्ण केला.
त्यांच्या या यशाबद्दल सेंट मीरा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डाॅ.जया राजगोपालन, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सोपान कांगणे, डाॅ. मनोज देवळेकर, डाॅ.आनंद लुकंड, डाॅ.सुवर्णा देवळाणकर, श्रीमती गुरबन्स कौर, शीतल महाडिक, सुवर्णा कांबळे आणि इतर प्राध्यापकांनी प्रा. एकता जाधव यांचे विद्या वाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.