नगर – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या योध्याचा सन्मान जय भगवान महासंघाच्या वतीने करण्यात आला असल्याचे जय भगवान महासंघाचे रमेश सानप यांनी संगितले.
कोविड योध्दा म्हणून महासंघाच्या वतीने आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रिन्सीपल नर्सिग हॉस्टेलचे खटके, आरटीओ दीपक पाटील, विभागीय नियंत्रक विजय गिते, डॉ.बडे, डॉ.मनोज घुगे, डॉ.अरुण सोनवणे, डॉ. संदीप काकडे, डॉ.विशाल कवादे, डॉ.खेडगर, संजय ठोंबरे, सेंट्रल बॅंकेच्या मुकादम गायकवाड, इंदीरा डुलगड आदीचा सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर बूथ हॉस्पिटल मधील डॉक्टर अभिजीत केकाण, मेजर देवदान काळकुंबे, ज्योती काळकुंबे, सत्वशीला वाघमारे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सानप म्हणाले की, सध्या करोनाने कहर केला असला तरी यावर मात करण्यासाठी आमचे डॉक्टर, परिचारीका, जिल्हाधिकारी आदींसह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी जिवाची बाजी लावत यावर या रोगावर मात करण्यासाठी लढत आहे. यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.