Omraje Nimbalkar on Tanaji Sawant । सध्या लोकसभेचे दोन टप्पे पार झाले आहेत. आता येत्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.त्याला आता ओमराजे निंबाळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
याने अन् याच्या बापाने वाट लावली.. Omraje Nimbalkar on Tanaji Sawant ।
मेळाव्यात तानाजी सावंत यांनी, “सगळ्या सहकारी संस्थाची याने अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला व अन् भंगार विकलं. खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं , तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं राण केलं, या सावंत सरांनी तुझ्यासाठी या शेतकऱ्यांची कष्टाची साखर गोडावूनला होती ती 60 लाख क्विंटल विकली,” अशा एकेरी उल्लेख करत तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता.
तू किस झाड की पत्ती है… Omraje Nimbalkar on Tanaji Sawant ।
तानाजी सावंत यांच्या टीकेला ओमराजे निंबाळकर यांनी उत्तर दिले. मात्र उत्तर देताना त्यांनी थेट तानाजी सावंत यांना इशारा दिलाय. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे की, मी ४० वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी सावंत यांचे नाव न घेता सावंतांना इशारा दिलाय. आता यावर तानाजी सावंत यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान. धाराशिव मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याठिकाणचे राजकीय वातावरण चांगले गरम झाले आहे. याठिकाणो मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जातो हे आता ४ जूनलाच समजेल.