नगर – योग विद्या धाम नगर शाखेतर्फे “षट्चक्र ध्यान साधना’ या ऑनलाइन कार्यक्रमाचे रविवार (दि.26) पासून आयोजन केले आहे. योग विद्या गुरुकुल, नाशिक यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली असुन, कुलगुरु, योगाचार्य डॉ.विश्वासराव मंडलिक हा कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष डॉ. सुंदर गोरे यांनी दिली.
या शिबिरात प्राचीन योगशास्त्र व आधुनिक वैद्यकशास्त्र यांची सांगड घालून संपूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून षट्चक्र ध्यान व अनुषंगिक विषयांवर विवेचन करण्यात येणार आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याचा चांगले राहणार आहे. रविवारी सकाळी 6.30 ते 8 यावेळेत होणार आहे. या साधनेत साधकांना गुगल मीट या ऍपद्वारे सहभागी होता येईल.