हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमध्ये उद्या (बुधवार) पासून मास्कसक्ती मागे घेण्यात येणार आहे. करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेली ही मास्क सक्ती जवळपास तीन वर्षांनंतर मागे घेण्यात येणार आहे. करोनाच्या साथीमुळे जेवढे निर्बंध लागू करण्यात आले होते, त्यातील सार्वजनिक ठिकाणी लागू असलेली मास्क सक्ती मागे घेण्याचा निर्णय सर्वात मोठा असणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी, खासगी ठिकाणी आणि प्रवासाच्या काळात मास्क सक्ती लागू असणार नाही. मात्र रुग्णालये, वृद्धाश्रम आदी काही महत्वाच्या ठिकाणी मास्क सक्ती यापुढेही लागू असणार आहे. हॉंगकॉंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
एकच दिवस आगोदर शेजारील मकाऊ शहरातील मास्क सक्ती मागे घेण्यात आली आहे. आता हॉंगकॉंगमधील स्थिती वेगाने सर्वसाधारण होत आहे, याबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी मास्क सक्ती मागे घेण्यात येत असल्याचे ली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/narayan-rane-to-pratap-sarnaik-bjps-clean-chit-to-anyone-congress-leader-shashi-tharoor-made-the-list-viral/
5 हजार हॉंगकॉंग डॉलरचा होता दंड
करोनाच्या काळात हॉंगकॉंगमधील मास्क सक्ती अत्यंत कठोरपणे लागू केली जात होती. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासादरम्यान मास्क न घातल्यास 5 हजार हॉंगकॉंग डॉलरचा दंड ठोठावण्यात येत असायचा. चीन प्रमाणेच हॉंगकॉंगमध्येही “झिरो कोविड’ धोरणाची अंमलबजावणी केली जात असायची. गेल्या 6 महिन्यांच्या काळात अर्थकारण पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत.