नवी दिल्ली :- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि आपने मंगळवारी सोशल मीडियावर स्वतंत्रपणे नेत्यांच्या नावांची समान यादी शेअर केली. संबंधित नेत्यांच्या विरोधातील चौकशीसत्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कथितपणे थांबल्याचा दावा करण्यासाठी थरूर आणि आपने ती कृती केली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न त्यामागे आहे.
आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर त्या पक्षाबरोबरच थरूर यांनी भाजपवर निशाणा साधला. थरूर यांनी तर नामोल्लेख टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. त्यासाठी त्यांनी न खाऊंगा; ना खाने दुंगा या मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी घोषणेचा आधार घेतला.
संबंधित घोषणेच्या अर्थाविषयी मला नेहमीच कुतूहल वाटते. ती बहुधा फक्त गोमांसापुरती असावी असे वाटते, असे उपहासात्मक भाष्य थरूर यांनी ट्विटरवरून केले.
ट्विटसमवेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कथितपणे अभय मिळालेल्या नेत्यांच्या नावांची यादीही जोडली. त्या यादीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांच्याबरोबरच भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक या महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश आहे.
This is going around, so sharing as received. Always wondered about the meaning of न खाऊँगा न खाने दूँगा. I guess he was only talking about beef! pic.twitter.com/oggXdXX8Ac
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 28, 2023
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भाजपकडून क्लीनचिट मिळालेल्या नेत्यांची ही यादी जारी करून भाजपला कोंडीत पकडलं आहे.
मनीष जी ने मोदी जी का OPERATION LOTUS किया FAIL
इसलिए PM MODI ने @msisodia जी को भेज दिया JAIL! pic.twitter.com/CcYJol9RzY— AAP (@AamAadmiParty) February 28, 2023
संबंधित नेत्यांच्या नावांची यादी आपनेही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर केली. तसेच, पापियों की पसंद भाजपा-वॉशिंग मशिन भाजपा अशी तिरकस टिप्पणीही केली.