हांगझोऊ – आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या हॉकीत भारतीय संघाने (#INDvHGK) हॉंगकॉंगचा 13-0 असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताच्या वंदना कटारीया, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का व दीपीका यांनी हॅट्ट्रिक नोंदवताना विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताच्या महिला हॉकी संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला आहे.
या सामन्यात वंदनाने 2, 16 व 48 व्या मिनिटाला गोल केले. हे सर्व गोल फिल्ड गोल ठरले होते. दीप ग्रेसने 11, 34 आणि 42 व्या मिनिटाला गोल केले. या तीनही गोलच्या वेळी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता व त्याचा लाभ दीप ग्रेसने अचुकपणे घेतला.
दीपीकानेही या दोघींप्रमाणे हॅट्ट्रिक साधली. तीने 4, 54 व 58 व्या मिनिटाला गोल केले. या तीघींना सुरेख साथ देताना संगिता कुमारीने 27 व 55 व्या मिनिटाला गोल केले. मोनिका 7 व्या तर, नवनित कौरने 58 व्या मिनिटाला गोल केले.
🇮🇳 SEMIFINAL BOUND!🏑
Our 🇮🇳 Women’s Hockey Team has powered their way into the semifinals after defeating 🇭🇰 by 13-0 in the last league match of the #AsianGames2022 👍
So far, our girls have played 4 league matches (including today) which ended with 3 wins & 1 draw to finish… pic.twitter.com/NfJTGkw0LJ
— SAI Media (@Media_SAI) October 3, 2023
भारत आता अ गटात 10 गुणांसह अव्वलस्थानी आहे. या गटात सात गुणांसह कोरियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अ आणि ब गटात अव्वल दोन संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळतील. त्यातील एक स्थान भारताच्या महिला संघाने प्राप्त करताना किमान एक पदक निश्चित केले आहे. भारताचा उपांत्य फेरीतील सामना येत्या गुरुवारी होणार आहे.