Honey Trap । देशाच्या सुरक्षेसोबत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यासंदर्भात एक कारवाई केलीय. एटीएसने प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव गोदीतील एका स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केली. हा हनी ट्रॅपचा प्रकार आहे. याप्रकरणी एटीएसने आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
समाज माध्यमातून गोपनीय माहिती पुरवली Honey Trap ।
प्राप्त माहितीनुसार, आरोपी अनेक महिन्यांपासून समाज माध्यमावर एका महिलेशी चॅटिंग करीत होता. महिलेच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देत असल्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणारा आरोपी पैशांच्या बदल्यात आरोपी महिलेला समाज माध्यमावर गोपनीय माहिती पुरवित होता असा आरोप आहे.
आरोपी महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित Honey Trap ।
आरोपी महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असल्याचा संशय आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून ती त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत होती, असा दावा एटीएसच्या सूत्रांनी केला आहे.
यापूर्वीही डिसेंबरमध्ये, महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील माझगाव गोदीत काम करणाऱ्या गौरव पाटीलला पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) एजंटसोबत गोपनीय माहिती सामायिक केल्याप्रकरणी अटक केली होती.
दरम्यान, काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसकडून परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. ही व्यक्ती आयएसआयसाठी करत असलायचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
हेही वाचा
Salman Azhari arrested : गुजरात एटीएसकडून मुस्लीम धर्मगुरु सलमान अजहरींना अटक ; प्रक्षोभक भान केल्याप्रकरणी कारवाई
UP ATS Action : उत्तरप्रदेश एटीएसकडून परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला अटक ; आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप