Main Atal Hoon on OTT| माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता पंकज त्रिपाठीने अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. सिनेमागृहानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.
‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा 14 मार्च 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 14 मार्चपासून प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. रवी जाधव यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील विविध बाजूंचे पैलू उलगडण्यात आले आहेत. Main Atal Hoon on OTT|
View this post on Instagram
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या चित्रपटात त्यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. पंकज त्रिपाठीसोबत या चित्रपटात पियुष मिश्रा, दयाशंकर पांडे, राजा सेवक आणि एकता कौल सारखे दमदार कलाकार आहेत.
पंकज त्रिपाठीच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो ‘मर्डर मुबारक’ या मर्डर मिस्ट्री चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात पंकज एका खुनाच्या आरोपीचा शोध घेताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर आणि टिस्का चोप्रा असे अनेक तगडे स्टार्स आहेत. हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. Main Atal Hoon on OTT|
हेही वाचा:
देशातील ‘या’ राज्याच्या शाळेत दाखल झाली पहिली एआय शिक्षिका ; काय आहेत वैशिष्ट्ये वाचा ?