पुणे- अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट पुणे पोलिसांनी उध्वस्त केले आहे. त्यांचे मी विशेष कौतुक करतो. पोलिसांच्या कामगिरीमुळे त्यांना २५ लाखांचे बक्षीस जाहीर करतो. या कामगिरीमध्ये गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि इतरांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
ड्रग्ज तस्करी मुळापासून उखडून टाकण्यासाठी पेडलर आणि साठा करून विक्री करणाऱ्याविरुद्धही कारवाई सुरूच ठेवण्याची सूचना, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Home Minister Devendra Fadnavis) यांनी केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात त्यांनी भेट देऊन, टीमचे कौतुक केले.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch of Pune Police) आठवडाभरात आतापर्यंत पुणे, कुरकुंभ, सांगली आणि दिल्ली येथे छापेमारी करत तब्बल 3 हजार 600 कोटींचे सुमारे 1800 किलो मेफेड्रोन(एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणात विविध देशांत हे एमडी ड्रग पाठवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा केला जात आहे.