Sachin tendulkar amir hussain : टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या काश्मीर दौऱ्यावर आहे. नुकताच मास्टर ब्लास्टरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो आपली कार थांबवत स्थानिक लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसत होता. दरम्यान, सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काश्मीरमधील आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या खास चाहत्याला भेटताना दिसत आहे. | Sachin tendulkar amir hussain
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर दिव्यांग क्रिकेटर आमिर हुसेनला भेटताना दिसत आहे.आमिरला दोन्ही हात नाहीत आणि तो खांदे आणि मानेमध्ये अडकलेल्या बॅटने फलंदाजी करतो. नुकताच आमिरचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्याचे कौतुक खुद्द सचिनने ट्विट करून केले होते.
व्हिडिओमध्ये मास्टर ब्लास्टर आमिरशी बोलताना दिसत आहे. सचिन आमिरच्या भावनेचे कौतुक करत त्याला खरा हिरो म्हणत आहे. सचिनला भेटल्यानंतर आणि त्याची स्तुती ऐकल्यानंतर आमिर व्हिडिओमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळते. | Sachin tendulkar amir hussain
यावेळी सचिनने आमिरशी बराच वेळ बसून बोलून त्याच्या संघर्षाबद्दल बरेच काही जाणून घेतले. यासोबतच क्रिकेटच्या देवाने आपल्या जबरा फॅनला एक खास भेटही दिली आहे. सचिनने आमिरला भेट म्हणून बॅट दिली. व्हिडिओमध्ये सचिनही आमिरसोबत त्याचा आवडता शॉट, कव्हर ड्राईव्ह खेळताना दिसत आहे. | Sachin tendulkar amir hussain
View this post on Instagram
मास्टर ब्लास्टरने आपले वचन पाळले
आमिर हुसैनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा त्याने सचिनला आदर्श मानत असल्याचे म्हंटले होते. यानंतर मास्टर ब्लास्टरने ट्विटमध्ये आमिरचे कौतुक केले आणि लवकरच भेटण्याचे आश्वासन दिले. याच कारणामुळे सचिन खास आमिरला भेटायला आला होता.